Top News

अंधार


वचन तुझे ते ठरले खोटे
धोका मला तु देऊन गेलीस

संग जगण्याची शपत घेउनी
एकट्याला का सोडुन गेलीस

काय सांगु मी कसे जगु मी
जगण्याची सारी हिंमत नेलीस

जागे ठेवले इथे मला तू
स्वःता सरणावर झोपून गेलीस

घट्ट धरलेला आजवर तू
हात का माझा सोडुन गेलीस

उजेडाची संगत धरुनी
अंधारात मला सोडुन गेलीस

कवी-आकाश कांबळे
९५९५६९५७१०

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने