दुःख व्यक्त करीन म्हटलो
आश्रू माझे ढळलेच नाही
जिवापाड प्रेम माझे
का ग तुला कळलेच नाही
अपेक्षा होती नविन दिवसाची
आधिचा मात्र ढळलाच नाही
वाट पाहिली ज्या साथीची
हात तो हातास मिळलाच नाही
भुल केली माझ्या नयनांनी
दुसरे का कोणी दिसलेच नाही
दुर जाताना जवळुन माझ्या
माघ का एकदा पाहिलेच नाही
माझ्या बद्दल थोडस प्रेम
मनात तुझ्या का उरलेच नाही
काळजास आग लावुन गेलीस
पण ते पुर्ण जळलेच नाही
पण ते पुर्ण जळलेच नाही
कवी-आकाश कांबळे
९५९५६९५७१०
टिप्पणी पोस्ट करा